सुशिल संसारे
आजच MPSC ने मुख्य परीक्षेतील भाषा विषयांचे गूढ उलघडले आहे. मी मुलाखतीला असतांना मुंबई केंद्रावर,मुलाखतीच्या आधी,सर्वांनाच या बद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल याच पर्यायाकडे होता. आणि नंतर आत्ता यशदा मधेही श्री. मोरे सरांशी चर्चा झाल्यावर हा मुद्दा समोर आला होता. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की MPSC ने खूप विचारांती हा निर्णय घेतला आहे आणि तो माझ्या मते सर्व परीक्षार्थींना लाभकारी असेल.
MPSC ने ठरवलेली पद्धत :-
१) पेपर मिश्र स्वरूपाचा असेल.
२) दोन भागात विभागले आहेत.
पेपर क्र. १) :- वर्णनात्मक मराठी आणि इंग्रजी. (यात लिखाण काम असेल.)
पेपर क्र. २) :- बहुपर्यायी मराठी आणि इंग्रजी. (यात PSI, STI प्रमाणे प्रश्न असतील.)
३) प्रत्तेक पेपर ला १०० Marks आहेत. एकूण २०० Marks. पण वेळ दोघांचा वेगळा आहे….
पेपर क्र. १) :- ३ तास
पेपर क्र. २) :- १ तास
४) दोन्ही भागाचे २०० पैकी मिळणारे गुण Final Merit मध्ये धरले जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही भागात चांगले गुण मिळवाणे गरजेचे आहे.
५) पेपर क्र. १) साठी एकाच प्रश्न पत्रिका असून उत्तर पत्रिका मात्र वेगवेगळी असेल.
पेपर क्र. २) साठी एकाच प्रश्न पत्रिका व एकाच उत्तर पत्रिका असेल.
६) पेपर क्र. २) मध्ये negative marking असेल… म्हणजेच तीन चुकीच्या उत्तरांसाठी एक मार्क वजा होईल.
७) ही पद्धत आत्ता होणाऱ्या राज्यसेवा (मुख्य ) २०१६ पासून लागू होईल.
(कृपया एकदा स्वतः MPSC च्या website वर जाऊन सदर घोषणा वाचावी.)
महाराष्ट्रातील सर्वोच्च अधिकारी निवडतांना त्यांची भाषेची गुणवत्ता केवळ व्याकरण किंवा objectives प्रश्नाने ठरवणे फार अवघड आहे. निबंध आणि भाषांतर यातून भाषेची प्रगल्भता तर कळतेच शिवाय त्या व्यक्तीचे विचार, चौकस बुद्धी, जागरुकता या गोष्टीही समोर येतात. अर्थात या माझ्या मताशी इतरांचे दुमत असणेही साहजिक आहे.
वादाचा मुद्दा :- पेपर तपासण्याची प्रक्रिया….
हेही तितकेच खरे आहे. पण जर सगळ्याच पेपरचे अयोग्य पद्धतीने मूल्यमापन होते असे आपण म्हणत असू तर भाषा विषयात उत्तम marks मिळवलेले विद्यार्थीही आहेतच की.…
मित्रांनो या विषयांचे लेखी स्वरुपात असण्याचे काय महत्व आहे ते आम्हाला आत्ता training period मध्ये काळाते आहे. मला मान्य आहे की काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो…. पण तुम्ही जर थोडा विचार केला तर तुम्हाला असे लक्षात येईल की त्या विद्यार्थ्यांनीही त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी तितकेच कठोर परिश्रम घेतले असतात…. कुणीही एकाकी एखद्या गोष्टीत तरबेज होत नाही. त्यामुळे तुमच्याकडेही संधी आहे. त्याचा फायदा घ्या आणि जोमाने तयारीला लागा.
भाषा विषयाच्या अभ्यासाची माझी पद्धत:-
१) मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे. यात पेपर २) साठी PSI,STI, Assistant या सारख्या परीक्षांचे पेपर सोडवणे.
२) पेपर सोडवल्यावर आपल्या कमकुवत बाजूवर जास्त लक्ष द्यावे.
३) बाजारात १२वी साठीचे बोर्डाचे कोरे पेपर मिळतात, त्यावर निबंधाची practice करावी.
४) दर रविवारी मराठी व इंग्रजी चे दोन निबंध व्हायलाच पाहिजेत. ते सूज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावे.
५) मी स्वतः वर्तमान पत्रातील संपादकीय लेख, सकाळची लोकरंग पुरवणीतील लेख, हे वाचून तशा पद्धतीने लिहिण्याचा सराव केला होता. निबंध वाचतांना आणखी पुढे वाचत राहण्याची इच्छा वाटली पाहिजे.
६) व्याकरणासाठी मी दीपस्तंभाचे मराठीचे व पाल-सुरी चे इंग्रजीचे पुस्तक वापरले. त्याच्या देखील micro notes तयार केल्या होत्या.
७) उतऱ्यांचे भाषांतरासाठी मी आपल्या राज्यासेवेच्या CSAT च्या पेपर मधील उतारे वापरले. कारण त्याचे मराठी भाषांतर तिथेच सापडते. त्याच्याने practice चांगली झाली.
८) भाषांतरासाठी संपूर्ण वाक्य जसेच्या तसे येणे महत्वाचे नसून त्या वाक्याचा योग्य अर्थ, वाचण्याची link न तुटता, लागणे हा आहे. त्यामुळे त्या वाक्यातील एखादा महत्वाचा नसलेला शब्द सुटला तरी चालतो.
९) सारांश लेखनासाठी बाजारात खूप पुस्तके उपलब्ध आहेत. भरपूर सराव करावा.
१०) हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न करावा. बिन टोप्यांचे मराठी अक्षर काढू नये.
मित्रांनो अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे. कसून तयारी करा. भाषा विषयामुळे merit मध्ये आलेलेही आहेत आणि त्या मुळेच स्पर्धेच्या बाहेर पडलेलेही आहेत. त्याकडे दुर्लाक्ष करून चालणार नाही. तुमच्या भाषेच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अधिकारी मित्र आहेतच की…. So don't worry and keep practicing.
धन्यवाद.
It is effective to read ncert books (English literature) to improve English writing skills.
ReplyDeleteYes its true that NCERT books give very good content about English, but to improve more one should read English newspapers...specially editorials and personal experiences of writers to learn how they put their real life situations in writing...
DeleteWhich subject should be taken for writing practice?
DeleteThanks sir. Detail strategy about essay writing
ReplyDeleteThanks sir. Detail strategy about essay writing
ReplyDeleteThank u sir..
ReplyDelete