Sunday 24 July 2016

Don't get Confused...

नमस्कार मित्रांनो,

                      खुप दिवस वाट पाहायला लावल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला Facebook Messenger वर काल एक प्रश्न विचारण्यात आला की, "जर एखादा विषय दोन वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यासायचा असेल तर आधी पहिले पुस्तक वाचून त्याच्या notes काढून मग दुसरे पुस्तक वाचावे की, पहिल्या पुस्तकातून एखादा विशिष्ट topic वाचून तोच topic दुसऱ्या पुस्तकातूनही वाचावा आणि नंतर दोघांच्या notes एकदम काढाव्यात ?" त्या बद्दल मी वापरात असलेली पद्धत सांगतो. कृपया आपण ती आपल्या सोईप्रमाणे वापरावी. 


पहिल्यांदाच विषय वाचणाऱ्यांसाठी :-
       १) विषयाची संपूर्ण संकल्पना (broad view) समजून घेण्यासाठी सोप्यातले सोपे पुस्तक घेऊन ते आधी वाचावे. उदा. NCERT , शालेय क्रमिक पुस्तके... 
       २) वाचत असतांना कच्चे महत्वाचे मुद्दे लिहून ठेवावे म्हणजे तुम्हाला कळेल की विषय कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर अवलंबून आहे. नंतर MPSC/UPSC च्या syllabus मधील मुद्दे त्यात कितपत cover झालेत हे check करावे.
       ३) जर काही मुद्दे cover झाले नाहीत तर त्याच विषयाचे BA,BSc चे पुस्तक वाचवून त्यातील महत्वाच्या points च्या नोट्स काढाव्यात. पुन्हा एकदा खात्री करावी की आपल्या syllabus मधील सगळे points cover झालेत. 
       ४) एका वेळी एकाच पुस्तक पूर्ण वाचून notes काढून मग दुसरे पुस्तक वाचावे. एखादा टॉपिक २-३ पुस्तकातून वाचणे चुकीचे आहे कारण तुम्हाला त्या विषयाचे पूर्ण ज्ञान होणे महत्वाचे आहे.   

आधी तयारी केलेल्यांसाठी :-
        १) आपले जवळपास ३-४ पुस्तके वाचून झालेले असतात. त्यामुळे नवीन पुस्तकातून वाचावे कि नाही हा मोठा प्रश्न असतो. 
        २) यावेळी एखादे नावे पुस्तक हाती घेताना एक quick review करावा की त्यातून मला महत्वाचे काही मिळेल की नाही. अश्यावेळी आपल्या मित्रांचे सहकार्य नक्की घ्यावे. 
        ३) महत्वाची बाब, बाजारात अनेक नवीन पुस्तके येतात त्यातील चांगले पुस्तक निवडणे फार कठीण आहे. त्यामुळे इतर मित्रांकडून विचारून जर कोणी ते घेतले असेल तर त्यांच्या कडून घेऊन ते वाचवून मग ठरवावे कि ते घ्यावे कि नाही. 

                    
 धन्यवाद. 

सुशील संसारे.