Thursday 12 May 2016

सुरुवात करताना…

सुशिल संसारे. 


                                विध्यार्थी मित्रांनो / मैत्रिणींनो, पूर्व परीक्षेची answer key सर्व जणांनी check केलीच असेल. एकंदर scores वरून असे लक्षात येते की, Cut - off  हा खुल्या वर्गासाठी १४०-१५० असू शकेल. अजून final key यायची आहे. त्यामुळे ज्यांचा score १५० च्या वर असेल त्यांनी अभ्यासाला नक्कीच सुरुवात केली असेल. पण मी १३०-१४० score असणार्यांना सुद्धा मुख्य परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला देईन. या बाबतीत माझा स्वतः चा अनुभव फार विस्मयकारक होता. तो मी येथे नमूद करत आहे …. 

                                २०१४च्या पूर्व परीक्षेच्या वेळी माझी अशीच अवस्था होती. मी त्या वेळी SIAC मुंबईला होतो आणि ती माझी दुसरी पूर्व परीक्षा होती. माझा score कमी होता म्हणून मी MPSC कडे लक्ष न देता UPSC ची तयारी करत होतो. सोबतचे इतर मित्र मुख्य परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त होते व मी इतर वाचनात लागलो. खर सांगतो मित्रांनो या पूर्वी मी मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम कधीच पूर्ण केला नव्हता. कारण मी नेहमी हाच विचार करायचो कि जेव्हा मी मुख्य परीक्षा देईन तेव्हा आपोआपच तो होऊन जाईल.… कदाचित आपल्यापैकी काही जण असाच विचार करत असतील. पण याचा मला तोटाच झाला. जेव्हा पूर्व परीक्षेचा result लागला तेव्हा त्यात माझा number नव्हता…. मला त्याचे वाईटही वाटले नाही,कारण मी असा विचार आधीच करून ठेवला होता. त्या दिवशी माझ्या सोबतचे SIAC मधील सर्व मित्र पास झालेले होते. तेव्हा मला जाणीव झाली की सर्व पांढऱ्या बदाकांमध्ये एक काळा बदक कसा उठून दिसतो ते. 

                                 त्यातल्याच एका मित्राने अनवधानाने एक धारदार विधान केले ,'' महाराष्ट्रातील SIAC साठी select होणाऱ्या पहिल्या १०० मुलांमधून पूर्व परीक्षा fail होणाऱ्याची इथे select होण्याची लायकीच नाही.'' खूप खोलवर जखम झाली होती… पण तरीही चेहऱ्यावर हास्य होते. दुसऱ्याच दिवशी एक प्रश्न रद्द झाल्याने cut-off दोन मार्कांनी खाली आला… जणूकाही चमत्कारच झाल्याचा भास मला झाला… तेव्हा कळले कि MPSC त काहीही होऊ शकते. त्यामुळेच सांगतो मित्रांनो अभ्यास सुरूच ठेवा. कारण आत्ता केलेला अभ्यास कधीच वाया जाणार नाही… त्या नंतर माझ्याकडे फक्त दीड महिना होता. त्यात मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणे जवळ जवळ अशक्यच होते…. अतिशयोक्ती नाही सांगत मित्रांनो,पण त्या दीड महिन्यात मी खरोखर १२-१३ तास effective study केला. यात माझ्या SIAC मधील मित्रांचा मला खूप फायदा झाला. ते मला रोज काहीतरी target द्यायचे व मी ते दिवस अखेर पूर्ण करायचो. कदाचित त्यामुळेच मी पहिल्यांदाच मुख्य परीक्षा पास करून मुलाखतीला पात्र झालो. 

                                    सांगण्याचे तात्पर्य हेच कि तुम्ही थांबू नका. अभ्यास सुरूच ठेवा. भलेही त्याचा फायदा तुम्हाला आत्ता होणार नाही,पण भविष्यात माझ्या सारखी वेळ तुमच्या वर येणार नाही.…

धन्यवाद. 

8 comments:

  1. Mast re Sushil Bhai....Keep doing great work...God bless u.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u mitra...please share this blog with as many as you can.

      Delete
  2. Mast re Sushil Bhai....Keep doing great work...God bless u.

    ReplyDelete
  3. Nice blog. Mpsc pre 2016 made mala 124 aahet. Study karu ka main cha ani jaga vadnar ka?

    ReplyDelete
    Replies
    1. वरील post मध्ये शेवटी नमूद केल्या प्रमाणे cutoff चा विचार न करता अभ्यास सतत सुरूच ठेवावा…. केलेला अभ्यास कधीच वय जात नाही.

      Delete
  4. Thnx Sushil Sir It's so helpful for MPSC Aspirant,please share ur strategy towards MPSC & UPSC Preparation,reference Books,blogs & online study materials etc..

    Regards,
    Mr.Arjun Sansare

    ReplyDelete
  5. सर, मी सध्या क्लास च्या माध्यमातून मार्गदर्शन घेण्याच्या तयारीत आहे.मला क्लास कोणता लावावा यासाठी तुम्ही सल्ला दयावा... proper मार्गदर्शनाची गरज आहे...तुमच्या सल्ल्याची गरज आहे
    आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा...👍

    ReplyDelete
    Replies
    1. क्लासेस बद्दल मी सध्या काहीच सांगू शकत नाही कारण मला आत्ताच्या क्लासेस चा status माहित नाही. पण जर तुम्हाला MPSC बद्दल काहीच माहित नसेल तरच क्लास लावा. क्लास फक्त दिशा दर्शक असतो, अभ्यास तुम्हालाच करावा लागतो.

      Delete