Friday 13 May 2016

माझे MPSC मधील अनुभव

* नाव रावडे स्वप्निल आप्पासाहेब 

* 2. कोणत्या पदी निवड झाली -
तहसिलदार

* 3. मुख्य परिक्षेचा सीट क्रं-
PN005308

* 4.वय-
26

* 5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या ..: 
4 वेळा

* 6.शाळेतील माध्यम-
मराठी 

* 7.महाविदयालयातील माध्यम-
इंग्रजी

* 8.मुख्य गाव , तालुका , जिल्हा-
रुई छत्रपती , तालुका : पारनेर , जिल्हा: अहमदनगर

* 9.अगोदरचा काम करण्याचा अनुभव-
विक्रीकर निरीक्षक नोव्हे. 2013 पासून (2012 ला निवड)

* 10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश
CDS- 3 वेळा मुलाखतीतून बाहेर
SSC 2012 मध्ये tax assistant म्हणून निवड

* 11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?--- 
चाणक्य आणि ज्ञानदीप. 
मॉक मुलाखती दिल्या का ?- 
होय 5 ते 6 ठिकाणी

12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .
-1.excise sp
2. तहसिलदार
3. ARTO
4. DCEO
5. ACST

13.१०वी ला किती टक्के मार्क-81.73%

14. १२ वी ला किती टक्के मार्क-77.83%

15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळाले-BE IT 57%

16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
BE IT from MIT कॉलेज पुणे ,2011

17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे का-नाही

18.छंद अथवा अंवातर कौशल्ये-
carrom खेळणे

19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमी
जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण
ग्रामीण पार्श्वभूमी
-वडील माध्यमिक शिक्षक
आई गृहिणी
भाऊ प्राध्यापक

20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?
-Engg च्या क्षेत्रात मन रमत नव्हते
काहीतरी समाजासाठी करावे अशी इच्छा होती.
आपण खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो हि भावना

21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?
विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?
-नापास झाले कि टेन्शन येते आपोआप जास्त अभ्यास होतो
आणि आपल्या बरोबरची मुले पास झाली कि आपणही करू शकतो असा विश्वास मिळतो.
स्वतःवर नियंत्रण ठेवून आपण करू शकतो हे कायम स्वतःला बजावत राहणे

22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?
-अपयशासाठी कायम एकच गोष्ट कारणीभूत असते अभ्यासामधील कमी .
त्याच बरोबर maturity आणि सातत्य कमी पडले
सातत्य आणि मेहनत या दोन गोष्टीच यश मिळवून देतात
जास्त अभ्यास आणि परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाचे analysis करून यश मिळवता आले.


23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?
-परीक्षेच्या आधी काही दिवस सुट्टी घेऊन इतर वेळी ऑफिस मध्ये वेळ काढत काढत.
शक्यतो पूर्ण वेळ किंवा कमीत कमी 7 तास अभ्यास कसा होईल ते पहावे
-
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रिया
-CSAT ची तयारी नीट केली तर 90 मार्क्स आरामात मिळतात
GS मध्ये बरेचसे प्रश्न बाहेरचे होते पण मेरिट त्याच प्रश्नावर लागेल जे सगळ्यांना येत होते
जे सगळ्यांना येत ते चुकलं तर पास होण्याची शक्यता कमी होते.

25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?
-नाही लावली
-
-26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?
-पेपर 1--60
पेपर २--96

27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?
-मराठी 67
इंग्रजी 67
पेपर 1 53
पेपर 2 55
पेपर 3 64
पेपर 4 52
मुलाखत 67
एकूण 425

28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?
-आधीच्या सगळ्या पेपर्स चे analysis STI PSI आणि सगळ्याच mpsc परीक्षांचे पेपर्स चे पण
त्यानुसार पुस्तके वाचायला सुरवात करणे,.
पेपर 1 मध्ये इतिहास या विषयापेक्षा भूगोल या ऊशयावर भर द्यावा
पेपर 2 मध्ये कायद्यांच्या separately नोट्स काढून ठेवाव्यात वेळ मिळेल तेवा सातत्याने revision करावी
पेपर 3 मध्ये तयारी करताना रोज एकाच संस्थेचं पूर्ण अभ्यास करावा
एकापेक्षा जास्त संस्था किंवा कायदे एकाच दिवशी घेऊ नयेत

29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?
-ज्या प्रश्नामध्ये 2 पर्यायात confusion आहे तो सोडवायचाच.
3 पर्यायात confusion असणारे सर्व प्रश्न सोडून द्यायचे.
Calculated रिस्क घेऊन प्रश्न सोडवा

30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?
-Movies पाहणे आणि ज्या गोष्टींनी रिलॅक्स वाटते अशा गोष्टी मधून मधून करत राहणे.
-
-31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?
--जास्तीत जास्त प्रश्न सोडवा
पुस्तके कमी आणि नीट वाचा.
रोजच रोज अभ्यासच analysis लिहून ठेवा
रोज रात्री दिवसभरात आपण काय शिकलो एवढाच 10 मिनिटात आठवावे
Knowledge मध्ये value addition झाली असेल तर आपण योग्य मार्गाने चाललोय अस समजून घ्या

32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?
-खूप जास्त 
Geo आणि इकॉनॉमी साठी तर खूपच
Mrunal आणि gktoday ची website
प्रधानमंत्री आणि संविधान या ABP माझा च्या series नक्की बघा

33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?
-1 महिना
-
-34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?
--काही विषय जे अवघड जात होते त्यांच्या नोट्स काढल्या होत्या पण बऱ्याचशा पुस्तकांवरच काढल्या होत्या वेगळ्या नाही.
वेगवेगळ्या पुस्तकातला डेटा एकाच पुस्तकात घ्यायचा प्रयत्न करा
त्यासाठी पुस्तकातील मोकळ्या जागेचा वापर करा

35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?
-Separate नोट्स काढून
उदा.
कायदे
रिमोट सेन्सिंग
इतिहासातील कायदे
नवीन योजना
पेपर 3 मधील संस्था
पेपर 4 मधील economic theories
-
-36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?-
-Gktoday आणि ज्ञानदीप magazines
-
-37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?
--5 ते 6 मॉक दिले 
-दोन्ही मध्ये जास्त सारखेपणा नसतो पण confidence build व्हायला मदत होते
-जेवढे शक्य असेल तेवढे मॉक द्यावेत त्याचा नक्कीच फायदा होतो शक्यतो आपला कॉन्फिडन्स वाढेल अशाच ठिकाणी द्यावा
-
-38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?
-श्री. पटेल सर
-
-39.मुलाखत किती वेळ चालली ?
-15 मिनिट
-
-40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?
-Current आणि sales tax च्या संबंधित सगळे प्रश्न होते
सगळे opinion based होते
स्वप्निल रावडे
विक्रीकर निरीक्षक
BE IT
अध्यक्ष - पटेल सर

कोठून आलात?
ग्रामीण भागातील आहात काय?
सध्या काय करता?
NGT चा काय issue आहे??
रविशंकर यांनी यमुनेच्या काठवरचीच जागा का निवडली?
आर्मी ला ब्रिज बांधायला लावणे चुकीचे नाही काय??
का चुकीचे आहे?
JNU प्रकरण काय आहे?
JNU प्रकरणात दिल्ली पोलीस आयुक्तांनी बोलायला पाहिजे होते काय??
ते चुकीचे नाही का??
कोणत्या राज्याने निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणाची अट असण्याचा कायदा केला आहे?
तुम्हाला काय वाटत अशी अट असावी का?
का नसावी?
एखादा मध्यम मार्ग नाही का?
काही वर्षानंतर अशी अट ठेवता येईल का?
IT कायदा कधीच आहे?
त्याचा उद्देश काय आहे?
त्यात नुकसान भरपाई साठी काही तरतूद आहे काय?
IT चा प्रशासनात काय फायदा होईल??
राष्ट्रीय फुल?
राज्य फुल?
Sales tax च किती टार्गेट पूर्ण झालाय?
TDS काय आहे?
एखादया गोष्टीवर विक्रीकर लावायचा कि सेवा कर कसा ठरवणार?
SIM कार्ड घेतल्यावर कोणता टॅक्स लावणार?
प्रशासकीय अधिकारी म्हणून निर्णय घेताना कायदा सोडून इतर कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे??
GST काय आहे?
महाराष्ट्राला फायदा होईल कि तोटा?
Manufacturing state असल्याने महाराष्ट्रात उद्योगांचा असलेला कर बुडणार नाही का?
मग महाराष्ट्र सरकार उद्योगांना कशाला प्रोत्साहन देईल?
Dysp पसंतिक्रम का टाकला नाही??

41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?
-थोडेफार प्रश्न expect केल्यासारखे होते
बरेचसे unexpected प्रश्न होते.

42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?-STI ची नोकरी

43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?
-त्या प्रश्नावर मेरिट लागत नाही
सगळ्यांना जे येतात त्याच प्रश्नावर मेरिट लागते
ज्याच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही ते ignore करून जे करू शकतो तेच अधिक चांगले करणे गरजेचे.

44.आपल्या यशातील भागीदार कुटुंब/शिक्षक/मित्र?
-आई,बाबा,भाऊ , मामा, मामी, आजी आणि माझे मित्र ज्यानि वेळोवेळी प्रोत्साहन दिले असे माझे मित्र
याबाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो
या लोकांशिवाय मी पास होणे शक्यच नव्हते.

No comments:

Post a Comment