Wednesday 11 May 2016

About Me....Sushil Sansare(Dy CEO).

Hi all,


नाव :- सुशिल संसारे . 

शिक्षण :- 1) BSc (physics) 2008.
            2) MSc (physics) 2011.

MPSC गुण :-
            १) मराठी - ५१
            २) इंग्रजी - ७१
            ३) GS I - ४७
            ४) GS II- ४३
            ५) GS III-३८
            ६) GS IV-५४

             मुलाखत  - ६८

MPSC तयारी :- २०१२ पासून 

दिलेल्या परीक्षा :-
             १) PSI (२०१३) मुलाखत , निवड नाही 
             २) राज्यसेवा (२०१४) मुलाखत , निवड नाही 
             ३) राज्यसेवा (२०१५) मुलाखत व निवड. 

इतर परीक्षा :-
             १) NDA 
             २) CDS 
             ३) NCC special entry scheme.
             ४) SSC CGL  मुख्य परीक्षा. 
     
                     Army Officer साठीचे  SSB interviews:- ११ वेळा 

सध्याच्या निवडी बद्दल :- 

                   ''कुठलीही गोष्ट  सहजा सहजी  मिळत नसते  त्यासाठी  अथक  परिश्रम आणि सातत्य खूप गरजेचे असते ''. मित्रांनो मला या वाक्याचा प्रत्यय क्षणोक्षणी आला . मागील वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेत फक्त ५ मार्कांनी post हुकली … त्या गोष्टीचा पशात्ताप करत न बसता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो . स्पर्धेची जाणीव मला Defence साठीच्या SSB मुलाखत देतानाच झाली होती . त्यात ११ वेळा शेवटच्या टप्प्यातून माघारी आल्यामुळे माझा  'इगो ' कधीच  धुळीत मिळाला होता. त्याचा फायदा मला MPSC  च्या परीक्षा देतानाही जेव्हा result negative यायचा तेव्हा झाला . कदाचित त्या मुळेच मी स्थिर राहू शकलो . 

                       कुठल्या गोष्टीचा फायदा भविष्यात कुठे आणि कसा होईल ते सांगता येत नाही … म्हणून परीक्षा देत राहाव्यात . 

                       मी माझा स्पर्धा परीक्षातील  जीवन पाट सखोल लिहित आहे … तो पूर्ण होताच मी blog  वर post  करेन . 

यशात मोलाचा वाटा :- 
              
                      सर्व प्रथम आईवडिल आणि बहिणीचा खूप महत्वाचा वाट या माझ्या यशात आहे . मी इतर माझ्या सहकारी मित्रांपेक्षा थोडा नशीबवान होतो कि माझ्या आईवडिलांना या परीक्षांबद्दल पुरेशी माहिती होती . माझे वडील स्वतः माहिती मिळवत व ती आईलाही समजून सांगत . त्यामुळे मला घरी जास्त गोष्टी explain  कराव्या लागल्या नाही . मला वाटते कि इतरही पालकांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा … आपल्याला अनोळखी विषयाबद्दल जाणून घेण्याची वृत्ती नेहमीच जागृत ठेवायला हवी. 

                       त्या नंतर माझे गुरुजन वर्ग ,ज्यांनी मला योग्य वेळी मार्गदर्शन केले आणि कदाचित ते नसते तर मला हे शिखर गाठायला थोडा आणखी वेळा लागला असता असे श्री .रंजन कोळंबे सर . या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला अनेक गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले . मी ठरवलेच होते की आपल्याला प्लेटो होऊन प्रत्तेक सोक्रेटीस कडून ज्ञान मिळवायचे आहे . So you should be a Good Listener first . 

                        आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे ते सर्व मित्र ज्यांनी कायम मला push करण्याचे काम केले. स्पर्धा परीक्षेच्या या विश्वात मी ठरूनच खूप कमी मित्र बनवण्याचा प्रयत्न केला होता … कारण मला नाही म्हणणे जमत नसे . माझ्या प्रत्तेक मित्राचा मी माझ्या पद्धतीने अभ्यासाला अनुरूप उपयोग केला . त्यामुळे गरजे पुरतेच संभाषण आणि group discussions चा फायदा मला खूप जास्त झाला . 

संघर्ष करणार्यांना संदेश :- 

                          मित्रांनो या विश्वात एक गोष्ट पक्की खुणगाठ बांधून घ्या … इथे चुकीला माफी नाही , तुम्हाला support करणारी जनता कमी असून तुम्हाला खालीच खेचायला लोक अधिक उत्सुक आहेत , इथे वेळेला अनन्य साधारण महत्व आहे , गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि आपल्याकडे पशात्ताप करण्या इतकाही वेळ नसतो . त्यामुळे  जेवढा वेळ मिळतोय तेवढा सगळाच्या सगळा सत्कारणी लावा . एकदाका तुम्हाला post मिळाली की सर्व गोष्टी सुरळीत होतात . त्यामुळे Don't worry… Keep Struggling Keep Winning!!!

धन्यवाद . 

सुशिल संसारे . 

6 comments:

  1. Thank u sir for sharing your valuable success story.... we ll keep moving

    ReplyDelete
    Replies
    1. Yes my friend this is for you all...its my pleasure to help you out. Please share this blog with as many as you can.

      Delete
  2. अगदी मनातून लिहिलांस

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you shyam. Ajun khup kahi lihayche ahe...

      Delete
  3. अगदी मनातून लिहिलांस

    ReplyDelete
  4. Sir plz mpsc chi book list pathva plz Sir

    ReplyDelete