Sunday 2 October 2016

मुलाखत...

नमस्कार मित्रांनो,

                               राज्यसेवा मुख्य परीक्षा तुम्हाला चांगली गेली असेल अशी अशा करतो. तुम्हाला कदाचित कळले असेल की योग्य वेळी revision करणे किती महत्वाचे असते. त्याच बरोबर जर तुम्ही question papers solve केले असतील तर प्रश्नांचा नेमका अर्थ आणि त्याचे नेमके उत्तर शोधण्यात तुम्हाला जास्त अवघड गेले नसेल. ज्यांना परीक्षा अवघड गेली त्यांनी स्वतःच्या strategy चे analysis करावे. नेमका आपला अभ्यास कमी होता की आपली प्रश्न सोडवण्याची पद्धत चुकली हे जाणून घ्यावे आणि पुढच्या वेळी त्या चुका होऊ नयेत याची काळजी घ्यावी. 
                                
                                या नंतर च्या महत्वाचा टप्पा म्हणजे "मुलाखत". तसे पाहिले तर मुलाखत काही फारशी अवघड नसते. कारण त्यात ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे असेच प्रश्न विचारले जातात.... कदाचित माझ्या या वाक्याशी बहुतेक जण सहमत नसतील पण ते सत्य आहे. कित्तेक वेळा आपण ऐकले असेल कि आपला interview आपण स्वतःच drive करत असतो. तुम्ही सुरुवातीला जे उत्तर देता त्यावरच पुढचा प्रश्न अवलंबून असतो. उदा. तुम्हाला विचारले कि तुमचे नाव न सांगता परिचय द्या... तर सर्वात आधी आपण असे ऐकलेले असते कि नाव व गाव सांगायचे नाही. मग सरांनी तर फक्त नावच सांगू नका असे म्हटले आहे? मग काही जण interviewer ला असेही विचारतात कि सर गावाचे नाव सांगू का? या ठिकाणी आपण चुकतो...तुम्ही प्रश्न नीट ऐकायला शिकले पाहिजे. नाव न सांगता म्हणजे गाव सांगितले तर चालेल असेच असते. 

१) मी अबक, तालुका अबक, जिल्हा अबक येथून आलो आहे. 
२) मी अबक नदीच्या काठी वसलेल्या अबक गाव तालुका अबक व जिल्हा अबक येथून आलो आहे. 

                                वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत पण दुसऱ्यात मला माझ्या गावाशेजारील नदीचे महत्व माहित आहे व मला त्यावर जास्त प्रश्न विचारले जावेत अशी माझी अपेक्षा आहे हे दिसून येते. याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतांना तुम्हाला कोणत्या बाबींवर विचारले जाण्याची अपेक्षा आहे त्या बाबींचा उल्लेख करावा. पण प्रत्येक वेळेस असा उल्लेख टाळावा. 

                                 मागील दोन वर्ष्यांचे माझे interview मी डिटेल लिहून post कारेन. मी असे मुळीच म्हणणार नाही की तेच तुम्ही follow करा. कदाचित माझ्यापेक्षा त्यावेळी इतरांनी अधिक चांगली उत्तरे दिली असती. माझे interview फक्त नमुन्य खातर पाहावे.... कृपया copy करण्याचा प्रयत्न करू नये. मुलाखतीत तुमचा natural स्वभावच महत्वाचा असतो. 

धन्यवाद. 

सुशिल संसारे.

Thursday 1 September 2016

Studying while WORKING....

नमस्कार मित्रांनो ,

                                       मी अभ्यास करत असतांना आणि post मिळाल्यावरही भरपूर जणांनी विचारले की job करताना अभ्यास करता येतो का? किंवा job  करताना अभ्यास कसा करावा? त्यामुळे मी सध्या त्या विषयी लिहीत आहे आणि लवकरच ती पोस्ट मी upload करणार आहे...

धन्यवाद.

सुशील संसारे. 

Thursday 11 August 2016

Upcoming posts on this blog..

नमस्कार मित्रांनो,

                 पुढील काही दिवसात मी  posts upload  करणार आहे. तुम्हाला यात  काही addition करायची असेल तर comment box मध्ये comment करा.

१) राज्यसेवा २०१७ ची संपूर्ण action plan.
२) राज्यसेवा मुख्य २०१६ साठी ५  दिवसांपूर्वीची तयारी. 
३) Group Discussion चे महत्व व ते कसे करावे. 

धन्यवाद,
सुशील संसारे.
(Prob Dy CEO )

Saturday 6 August 2016

For Next 30 Days....Mains Strategy.






    


आणखी एक महत्वाची सूचना :-
                            या विषयांचा अभ्यास करतांना short notes काढाव्या. त्यात फक्त  विषयाशी संबंधित आकडेवारी नमूद करावी. या short notes चा उपयोग परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर होतो. त्यात उदा . जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल तर लोकसंख्येशी संबंधित आकडे लिहावे, अर्थशास्त्राशी संबंधित फक्त topic चे heading व त्याचे महत्वाचे आकडे लिहावेत . 

Congratulations!!!

हार्दिक शुभेच्छा ,

                      राज्यसेवा पूर्व २०१६ चा निकाल लागला....  काही जणांचे घोडे गंगेत नाहले तर काहींचे पानिपत झाले...ज्यांचा निकाल सकारात्मक लागला त्यांना खूप शुभेच्छा. एक टप्पा पार झाला.... "दिल्ली अभी दूर हैं". ज्यांना नकारात्मक निकालाचा सामना करावा लागला त्यांच्या साठी .... "बचेंगे तो और भी लढेंगे".  मुख्य परीक्षा ३० दिवसांवर आहे. आपली strategy तयार करा. प्रत्येक stage वर आपले १००% द्या. पुढील ३० दिवसांची strategy blog वर पोस्ट करणार आहे.

पुढील पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी:-

                       जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर, तुम्ही या मुख्य परीक्षेला बसणार आहात असेच समजून मुख्य परीक्षेची तरी चालू ठेवा. जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण होईल. आणि पुढच्या पूर्व परीक्षेत याची मदत होईल. खचून न जाता तयारीला लागा.

धन्यवाद.

   सुशील संसारे. 
(Prob. Dy CEO )

Sunday 24 July 2016

Don't get Confused...

नमस्कार मित्रांनो,

                      खुप दिवस वाट पाहायला लावल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला Facebook Messenger वर काल एक प्रश्न विचारण्यात आला की, "जर एखादा विषय दोन वेगवेगळ्या पुस्तकातून अभ्यासायचा असेल तर आधी पहिले पुस्तक वाचून त्याच्या notes काढून मग दुसरे पुस्तक वाचावे की, पहिल्या पुस्तकातून एखादा विशिष्ट topic वाचून तोच topic दुसऱ्या पुस्तकातूनही वाचावा आणि नंतर दोघांच्या notes एकदम काढाव्यात ?" त्या बद्दल मी वापरात असलेली पद्धत सांगतो. कृपया आपण ती आपल्या सोईप्रमाणे वापरावी. 


पहिल्यांदाच विषय वाचणाऱ्यांसाठी :-
       १) विषयाची संपूर्ण संकल्पना (broad view) समजून घेण्यासाठी सोप्यातले सोपे पुस्तक घेऊन ते आधी वाचावे. उदा. NCERT , शालेय क्रमिक पुस्तके... 
       २) वाचत असतांना कच्चे महत्वाचे मुद्दे लिहून ठेवावे म्हणजे तुम्हाला कळेल की विषय कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर अवलंबून आहे. नंतर MPSC/UPSC च्या syllabus मधील मुद्दे त्यात कितपत cover झालेत हे check करावे.
       ३) जर काही मुद्दे cover झाले नाहीत तर त्याच विषयाचे BA,BSc चे पुस्तक वाचवून त्यातील महत्वाच्या points च्या नोट्स काढाव्यात. पुन्हा एकदा खात्री करावी की आपल्या syllabus मधील सगळे points cover झालेत. 
       ४) एका वेळी एकाच पुस्तक पूर्ण वाचून notes काढून मग दुसरे पुस्तक वाचावे. एखादा टॉपिक २-३ पुस्तकातून वाचणे चुकीचे आहे कारण तुम्हाला त्या विषयाचे पूर्ण ज्ञान होणे महत्वाचे आहे.   

आधी तयारी केलेल्यांसाठी :-
        १) आपले जवळपास ३-४ पुस्तके वाचून झालेले असतात. त्यामुळे नवीन पुस्तकातून वाचावे कि नाही हा मोठा प्रश्न असतो. 
        २) यावेळी एखादे नावे पुस्तक हाती घेताना एक quick review करावा की त्यातून मला महत्वाचे काही मिळेल की नाही. अश्यावेळी आपल्या मित्रांचे सहकार्य नक्की घ्यावे. 
        ३) महत्वाची बाब, बाजारात अनेक नवीन पुस्तके येतात त्यातील चांगले पुस्तक निवडणे फार कठीण आहे. त्यामुळे इतर मित्रांकडून विचारून जर कोणी ते घेतले असेल तर त्यांच्या कडून घेऊन ते वाचवून मग ठरवावे कि ते घ्यावे कि नाही. 

                    
 धन्यवाद. 

सुशील संसारे. 

Sunday 12 June 2016

Stategic time out.

विध्यार्थी मित्रांनो,

                                यशदा मधील schedule थोडासा busy असल्याने post टाकायला थोडा उशीर होत आहे. त्यासाठी दिलगीर आहोत. लवकरच नवीन post publish करण्यात येईल.

                                मी माझा मराठी व इंग्रजी चा पेपर MPSC मधून मागवला आहे. तो मिळाल्यावर त्याचे snapshots upload केले जातील. तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 
 
                                तुमचा प्रतिसाद आम्हाला कार्य करण्यास प्रेरित ठेवेल. कृपया तुमचे प्रश्न या post च्या comment box मध्ये सांगा.



धन्यवाद .

सुशील संसारे. 

Tuesday 24 May 2016

mpsc source list

नमस्कार! आज मी mpsc  साठी जी पुस्तके वाचली होती त्याची source list तुमच्यासोबत share करणार आहे

सर्वात महत्वाचा disclaimer यात असा आहे कि प्रयेकाची बुक लिस्ट हे थोड्या फार प्रमाणात वेगळी असू शकेल. त्यामुळे माझा शब्द म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ अशातला काही भाग नहि. ! मात्र एका broad level  ला माझ्यामते तरी blog वर contribute करणाऱ्या माझ्या सहकार्यांच्या बुक लिस्ट मध्ये आणि माझ्याबुक लिस्ट मध्ये जे commom sources असतील ते अगदीच refer करता येऊ शकतील.


MPSC Prelims ( mostly the same sources as used for UPSC prelims)

.1)History:
- 11th and 12th std old ncert's of ancient,medieval, and modern Indian history
-new Ncert's themes in Indian history all 3 parts
-Spectrum modern Indian history(the best book for revision)
-for Maharashtra history refer 11th std state board textbook

2)Geography:
-9th to 12th std Ncert's
-G.C. Leong world physical geograhy
-Atlas
-Saudi maharashtra bhugol
-4th and 9th std state board textbooks

3)Social and economic development
-Ranjan Kolambe economics
-Sriram Ias notes
-Mrunal.org website economics articles from archives

4)Science:
-8th to 12th std NCERT's as well as state board science textbooks
-topics not covered from above source can be covered from Wizard science and/or Lucent Science

5)Environment
-12th std biology ncert last 4 chapters
-Shankar Ias notes

6)Polity
- M. Laxmikanth

7) Current affairs
- India- The Hindu and Indian Express
-Maharashta Times or : Loksatta
refer Unique bulletin towards the end

CSAT:
I had referred
R.S.Aggarwal Verbal and non verbal reasoning
R.S.Aggarwal Quantitative aptitute
for comprehension i would recommend solving previous years' MPSC csat papers along with test papers of various classes.

SOURCES FOR MPSC MAINS
1) General studies 1
History:
-11th and 12th std old ncert's of ancient,medieval, and modern Indian history
-new Ncert's themes in Indian history all 3 parts
-Spectrum modern Indian history(the best book for revision)
-for Maharashtra history refer 11th std state board textbook
-Grover history selected chapters(1757-1857 and governors related chapters)
-Y.N.Kadam history chapters not covered from previous sources

Geogaphy
-9th to 12th std Ncert's
-G.C. Leong world physical geograhy
-Atlas
-Saudi mpsc bhugol (there are two books one for sti etc i guess and another for mpsc)
 -4th and 9th std state board textbooks

2)General studies 2
-Indian constitution part: M.Laxmikanth
-Maharashtra polity from Unique Rajyaghatna part 1
-remaining part from Unique Rajyaghatna part 2
-Acts: ACTS must be done by dowloading and reading latest pdf files of all acts (with all amendments done till now included) and den taking out notes from these pdf's

3)General studies 3
-HRD by Ranjan Kolambe
- India Year Book ( all chapters first to last ,read and take out notes and den revise only the notes. and plz read the official govt version of India Year book and not any other version)
- syllabus point wise websites of various ministries of the Govt of India (for eg tribal affairs topic visit ministry of tribal affairs website). u will find various government schemes in detail on these websites.
-Lokrajya magazine for Maharashtra govt schemes as well as Maharashtra's latest Economic survey

4)General studies 4
Economics:
-Ranjan Kolambe economics
-Kiran desle deepstambh economics book
-Sriram Ias notes
-Maharashtra's latest Economic survey(very important)
Agriculture: Ranjan Kolambe selective topics according to syllabus points as well as agri topics from Saudi bhugol
Science:
-Ranjan Kolambe Science
-8th to 12th std NCERT's as well as state board science textbooks
-topics not covered from above source can be covered from Wizard science and/or Lucent Science
-Internet for remaining topics

English: Wren and Martin is a good source for grammar
Marathi: Walambe for grammar

Ok thats it from me! most important thing for MPSC is minimum but basic sources and maximum revision. revising what you have read for maximum number of times is very crucial for the exam
ALL THE BEST!

Sunday 22 May 2016

निबंधाचे काही साधारण विषय.

सुशिल संसारे. 


मराठी व इंग्रजीसाठी मी माझे मित्र श्री. मंगेश शिंदे(मुख्य अधिकारी, नगरपालिका ) यांनी मला दिलेले काही विषय येथे नमूद करत आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत निबंध लिहून practice करावी…. 

१) राजकारण :- 
         - बदलते राजकारण बदलता समाज. 
         - आधी काय राजकारण की समाजकारण.  
         - मतदार राजा जागा झालाय!!!

२) प्रशासन:- 
        - Good Governance/ सुशासन काळाची गरज. 
        - e-governance फायदे आणि तोटे. 

३) पर्यावरण:- 
        - आदिवासी आणि जमीन अधिग्रहण…समस्या आणि उपाय. 
        - दुष्काळ किती नैसर्गिक किती मानवनिर्मित. 
        - लातूरच्या भयंकर दुष्काळात सापडलेल्या एका शेतकऱ्याचे मनोगत. 

४) भारत:- 
        - असा आहे माझ्या स्वप्नातला भारत. 
        - खरच आपण सहिष्णू आहोत का ? 

५) महाराष्ट्र:- 
        - आज महाराष्ट्र मागे पडतोय का ?
        - महारष्ट्रातील तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्या.

६) महिला:-
        - महिला या विषयावर नेहमी राजकारणच होते समाजकारण नाही. 
        - महिलांना सर्व क्षेत्रात ५०% आरक्षण दिले तर…  
        

७) इतर:-
        - महाराष्ट्राने भारताला सहकार दिला पण तो महाराष्ट्रात रुजला का ? 
        - भारतीय शिक्षण पद्धत… आढावा. 
        - नक्षलवादाचे बदलते स्वरूप … 
        - जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले…। 

             
                            मित्रांनो हे topics फक्त practice साठी आहेत. असेच विषय परीक्षेत येतीलच याची खात्री नाही. त्यामुळे आणखी वेगवेगळ्या विषयांचा सराव करत राहावा. लोकसत्ता पेपर मध्ये श्री. देशमुख सर "करियर" पुरवणीत निबंध लेखनावर लेख लिहित असतात. कृपया ते पाहावे. त्यात काहीवेळा सरांनी काही current topics सुद्धा दिले होते. UPSC पेपर मधील विषय ही पाहावे. 

                           निबंध हा विषय MPSC ने सामान्य विषायांपुरता मर्यादीत न ठेवता मागील वर्षी मराठीत "भाषेचे व्याकरण भाषेचे चरित्र" असे विशेष भाषेशी निगडीत विषय निवडले आहेत. त्यामुळे असे विषयही तुमच्या लिखाणात यायला हवे. 


धन्यवाद . 

Friday 20 May 2016

मराठी व इंग्रजी paper बद्दल…..

सुशिल संसारे 



                               आजच MPSC ने मुख्य परीक्षेतील भाषा विषयांचे गूढ उलघडले आहे. मी मुलाखतीला असतांना मुंबई केंद्रावर,मुलाखतीच्या आधी,सर्वांनाच या बद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कल याच पर्यायाकडे होता. आणि नंतर आत्ता यशदा मधेही श्री. मोरे सरांशी चर्चा झाल्यावर हा मुद्दा समोर आला होता. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की MPSC ने खूप विचारांती हा निर्णय घेतला आहे आणि तो माझ्या मते सर्व परीक्षार्थींना लाभकारी असेल. 

MPSC ने ठरवलेली पद्धत :- 
           १) पेपर मिश्र स्वरूपाचा असेल. 
           २) दोन भागात विभागले आहेत.
                           पेपर क्र. १) :- वर्णनात्मक मराठी आणि इंग्रजी. (यात लिखाण काम असेल.)
                           पेपर क्र. २) :- बहुपर्यायी मराठी आणि इंग्रजी. (यात PSI, STI प्रमाणे प्रश्न असतील.)
                           
            ३) प्रत्तेक पेपर ला  १०० Marks आहेत. एकूण २०० Marks. पण वेळ दोघांचा वेगळा आहे…. 
                             पेपर क्र. १) :- ३ तास 
                             पेपर क्र. २) :- १ तास 

            ४) दोन्ही भागाचे २०० पैकी  मिळणारे गुण Final Merit मध्ये धरले जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही भागात चांगले गुण मिळवाणे गरजेचे आहे. 
            ५)  पेपर क्र. १) साठी एकाच प्रश्न पत्रिका असून उत्तर पत्रिका मात्र वेगवेगळी असेल
                  पेपर क्र. २) साठी एकाच प्रश्न पत्रिका व एकाच उत्तर पत्रिका असेल. 
            ६)  पेपर क्र. २) मध्ये negative marking असेल… म्हणजेच तीन चुकीच्या उत्तरांसाठी एक मार्क वजा होईल. 
            ७) ही पद्धत आत्ता होणाऱ्या राज्यसेवा (मुख्य ) २०१६ पासून लागू होईल. 

(कृपया एकदा स्वतः MPSC च्या website वर जाऊन सदर घोषणा वाचावी.)


                                    महाराष्ट्रातील सर्वोच्च अधिकारी निवडतांना त्यांची भाषेची गुणवत्ता केवळ व्याकरण किंवा objectives प्रश्नाने ठरवणे फार अवघड आहे. निबंध आणि भाषांतर यातून भाषेची प्रगल्भता तर कळतेच शिवाय त्या व्यक्तीचे विचार, चौकस बुद्धी, जागरुकता या गोष्टीही समोर येतात. अर्थात या माझ्या मताशी इतरांचे दुमत असणेही साहजिक आहे.

वादाचा मुद्दा :- पेपर तपासण्याची प्रक्रिया…. 

                                हेही तितकेच खरे आहे. पण जर सगळ्याच पेपरचे अयोग्य पद्धतीने मूल्यमापन होते असे आपण म्हणत असू तर भाषा विषयात उत्तम marks मिळवलेले विद्यार्थीही आहेतच की.… 

                                 मित्रांनो या विषयांचे लेखी स्वरुपात असण्याचे काय महत्व आहे ते आम्हाला आत्ता training period मध्ये काळाते आहे. मला मान्य आहे की काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो…. पण तुम्ही जर थोडा विचार केला तर तुम्हाला असे लक्षात येईल की त्या विद्यार्थ्यांनीही त्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी तितकेच कठोर परिश्रम घेतले असतात…. कुणीही एकाकी एखद्या गोष्टीत तरबेज होत नाही. त्यामुळे तुमच्याकडेही संधी आहे. त्याचा फायदा घ्या आणि जोमाने तयारीला लागा. 

भाषा विषयाच्या अभ्यासाची माझी पद्धत:-

            १) मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे. यात पेपर २) साठी PSI,STI, Assistant या सारख्या परीक्षांचे पेपर सोडवणे. 
            २) पेपर सोडवल्यावर आपल्या कमकुवत बाजूवर जास्त लक्ष द्यावे. 
            ३) बाजारात १२वी साठीचे बोर्डाचे कोरे पेपर मिळतात, त्यावर निबंधाची practice करावी. 
            ४) दर रविवारी मराठी व इंग्रजी चे दोन निबंध व्हायलाच पाहिजेत. ते सूज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावे. 
            ५) मी स्वतः वर्तमान पत्रातील संपादकीय लेख, सकाळची लोकरंग पुरवणीतील लेख, हे वाचून तशा पद्धतीने लिहिण्याचा सराव केला होता. निबंध वाचतांना आणखी पुढे वाचत राहण्याची इच्छा वाटली पाहिजे. 
            ६) व्याकरणासाठी मी दीपस्तंभाचे मराठीचे व पाल-सुरी चे इंग्रजीचे पुस्तक वापरले. त्याच्या देखील micro notes तयार केल्या होत्या. 
            ७) उतऱ्यांचे भाषांतरासाठी मी आपल्या राज्यासेवेच्या CSAT च्या पेपर मधील उतारे वापरले. कारण त्याचे मराठी भाषांतर तिथेच सापडते. त्याच्याने practice चांगली झाली. 
            ८) भाषांतरासाठी संपूर्ण वाक्य जसेच्या तसे येणे महत्वाचे नसून त्या वाक्याचा योग्य अर्थ, वाचण्याची link न तुटता, लागणे हा आहे. त्यामुळे त्या वाक्यातील एखादा महत्वाचा नसलेला शब्द सुटला तरी चालतो. 
            ९) सारांश लेखनासाठी बाजारात खूप पुस्तके उपलब्ध आहेत. भरपूर सराव करावा. 
            १०) हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न करावा. बिन टोप्यांचे मराठी अक्षर काढू नये. 


                                 मित्रांनो अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे. कसून तयारी करा. भाषा विषयामुळे merit मध्ये आलेलेही आहेत आणि त्या मुळेच स्पर्धेच्या बाहेर पडलेलेही आहेत. त्याकडे दुर्लाक्ष करून चालणार नाही. तुमच्या भाषेच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अधिकारी मित्र आहेतच की…. So don't worry and keep practicing. 


धन्यवाद. 

Thursday 19 May 2016

about me: Mukul Milind Kulkarni ( Deputy Collector through state services 2014)

about me
नमस्कार ! माझं नाव मुकुल मिलिंद कुलकर्णी.
२०१४ च्या राज्यसेवा परीक्षेच्या अंतर्गत माझी उपजिल्हाधिकारी या पदासाठी निवड झालेली होती तसेच महाराष्ट्रातून त्या वर्षी माझा पाचवा क्रमांक होता
माझे मार्क्स मला जसे आठवत आहेत त्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आहेत
GS TOTAL : 270 ( त्यात सध्यातरी मला paper ४ ला ८० आणि paper ३ ला ७५ होते असं आठवत आहे )
INTERVIEW :६५ (मोरे सरांचं PANEL )
तसंच २०१४ च्या UPSC च्या civil services examination च्या अंतर्गत माझा देशात ५०५ असा क्रमांक होता व मला indian audit and accounts service allot झाली होती
तसेच या वर्षीच्या civil services परीक्षेत माझा २३८ हा rank आलेला आहे
या blog वर लिहिण्याचा माझा उद्देश हा आहे कि मी mpsc चा अभ्यास कशाप्रकारे केला त्याचसोबत upsc व mpsc असा सोबत अभ्यास कसा करता येईल या दोन गोष्टी मी मुख्याप्रकारे share करू इच्छितो. तर त्याआधी माझी थोडक्यात माहिती सांगतो ज्याला आपण introduction असं म्हणतो
नाव : मुकुल मिलिंद कुलकर्णी
गाव : पुणे
शिक्षण : B.PHARMACY (AISSMS' COLLEGE OF PHARMACY PUNE)
MPSC चे एकूण ATTEMPT : ३ (पहिल्या ATTEMPT ला PRELIMS clear होऊ शकलो नव्हतो तर दुसर्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊ नव्हतो शकलो )
UPSC चे आतापर्यंत चे ATTEMTS :३
तर हि झाली माझ्याबद्दलची थोडक्यात माहिती . एक दोन दिवसात मी MPSC परीक्षेची तयारी कशी केली याविषयी सविस्तर लिहेन . धन्यवाद !

Tuesday 17 May 2016

"माझी अभ्यासाची पद्धत."

सुशिल संसारे.


                             माझ्या संघर्ष करणाऱ्या मित्रांनो, या वर्षीचा MPSC चा attempt मी दिला नाही. पण जर मी तो दिला असता तर मी पुढील प्रमाणे माझा अभ्यास केला असता…. 

                 
                            अभ्यास करण्याच्या माझ्या पद्धतीत फार काही वेगळे पण नाही. B.A., B.Com., B.E. किंवा B.Sc. करणरे विध्यार्थी ज्या प्रमाणे परीक्षेच्या एक आठवडा आधी अभ्यासाला सुरुवात करतात त्याच पद्धतीचा वापर मी केला. फक्त फरक एवढाच कि मी हि पद्धत थोडी extend केली.


मुख्य परीक्षा :- २३ सप्टेम्बर २०१६…
कालावधी:-    ४ महिने…. पण मी स्वतः ३ महिनेच धरेन.

१) पहिल्यांदा मुख्य परीक्षा देणारे आणि अजून पूर्ण अभ्यासक्रम न झालेले…. यांच्यासाठी.

                            या ३ महिन्यांचे दोन भाग करू…

            अ) पहिल्या दीड महिन्यात तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम संपवणे हा target असेल.
                      - यात सर्वात अवघड विषय आधी  घेणे .
                      - विषयांचे groups केले तर अभ्यास अधिक सोपा होईल .
                         Eg. भूगोल + विज्ञान + पर्यावरण , भूगोल + कृषी , राज्यशास्त्र + govt. schemes, etc.
                      - ठरवलेल्या दिवसांपेक्षा एक दिवसही extra देऊ नये…
                      - सोप्या व लवकर संपणाऱ्या विषयांचे दिवस दुसऱ्या अवघड विषयांसाठी ठेवावे .
                      - रविवारी फक्त मराठी व इंग्रजी चा अभ्यास करावा.
                      - रोज कमीत कमी १० तास अभ्यासाचे टार्गेट असावे.
                      - या दीड महिन्यात तुमच्या आधी जर notes  नसतील तयार तर त्या तयार कराव्या.( Very IMP )
                      - दीड महिन्याच्या शेवटी तुमच्या कडे सर्व विषयांचे पूर्ण ज्ञान  व solid notes तयार पाहिजेत.

 I know its tough but not impossible....if you want to achieve something great then your efforts must be that great. अभ्यासात सातत्याने हे शक्य आहे . I guarantee you... if I can do it then why not you!!!

              ब) Second half शेवटचा दीड महिना … 
                       - यात पहिल्या १५ ते २० दिवसात तुम्हाला मिळतील तेवढे वेगवेगळ्या क्लासेस चे papers सोडवणे.
                       - papers वेळेत सोडवणे खूप महत्वाचे आहे. याच्याने तुमचा confidence वाढतो आणि वेगवेगळे प्रश्न कसे handle  करायचे ते समजेल.
                       - papers सोडवतांना तुम्हाला काही experiments करायचे असतील तर याच stage ला करावे Eg. एखादा topic कच्चा असेल तर त्याला कोणत्या वेळी सोडवायला घ्यावा हे ठरवणे.
                       - papers सोडावून झाल्यावर तुम्हाला कळेल की तुमचा कोणता विषय किंवा कोणता topic कच्चा आहे. त्यावरच focus करणे.
                       - papers  मधून मिळालेली extra  माहिती तुमच्या notes मध्ये टाकून update करणे.
                       - नंतरच्या २० दिवसात एक revision व्हायलाच हवी .
                       - revision करतांना मुख्यतः आकडेवारी चा संबंध जेथे येतो त्या ठिकाणी A4 paper चा half paper करून त्यावर फक्त संबंधित विषयाची आकडेवारी लिहिणे. या आकडेवारीचा उपयोग exam च्या शेवटच्या दिवशी फक्त एक नजर टाकण्यासाठी करावा. आकडे काही काळासाठीच लक्षात राहतात.
                        -अर्थ संकल्प आणि लोकसंख्या माहिती हे त्या त्या paper च्या आदल्या दिवशी वचने.


   २) आधी मुख्य परीक्षा दिलेल्यांसाठी …… 


                                      वरील पद्धतीत फक्त पहिल्या १५-२० दिवसात तुम्ही मागील notes मध्ये जास्तीत जास्त addition करायची आहे. प्रत्तेक विषयाचे या आधी न वाचलेले पुस्तक वाचावे.(कोणती पुस्तके वाचावी यावर मी स्वतंत्र post टाकणार आहे. इतर blogs वर पुस्तकांची यादी दिलेलीच असते. तुम्ही ती refer करू शकता. मी फक्त मी वाचलेली पुस्तकेच post करेन.  )…… आणि second half तुमच्यासाठी सारखाच राहील.



महत्वाचे :- 

                              MPSC सारख्या परीक्षेत माझ्या मते स्वतः च्या NOTES काढणे खूपच जास्त महत्वाचे आहे. मी हे स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे. NOTES काढल्यामुळे परीक्षेच्या शेवटच्या वेळी revision करतांना मानसिक समाधान असते की माझ्याकडे एवढ्या NOTES आहेत आणि त्यात मी सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षेच्या आदल्या रात्री पुस्तकांचा ढीग घेऊन बसण्यापेक्षा एकच NOTES घेऊन वाचने कधीही चांगले आणि सोपे.

                               तुमच्या NOTES काढून झाल्यावर त्याचायचं micro notes काढाव्यात.(NOTES कशा  काढाव्या या साठी स्वतंत्र post टाकण्यात येईल.) मी यावरच जास्त भर दिला आहे.


                               तुमचं काहीही शंका असतील तर please comment मध्ये post कराव्यात. माझ्यापरीने निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन.



धन्यवाद.




Monday 16 May 2016

About me Anuradha Gurav (Dy.SP/ACP)

Hello Friends,
Welcome to MPSC Struggler's Blog..

माझ्या MPSC  प्रवासा बद्दल  थोडक्यात …

मी अनुराधा कृष्णाजी गुरव (पोलिस उपाधीक्षक  )  जिल्हा  सातारा येथील  रहिवासी  आहे. माझे १० वी पर्यंत चे शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे झाले . १२वी Science मधून करून नंतर engineering D. Y. Patil College Of Engineerimg ,Kolhappur येथून झाले . 

मी MPSC चा अभ्यास जुलै २०१३ पासून सुरु केला .मी भगीरथ चा Foundation course पूर्ण केला . आणि मला वाटते तिथेच माझा Basic Study पूर्ण झाला . 

माझ्या MPSC attempt बद्दल बोलायचे झाले तर माझी निवड हि दुसऱ्या attempt  मध्ये झाली . 
मी २०१४ ला पहिल्या प्रयत्नात Interview  पर्यंत  पोहचले होते . पण मी तेव्हा post फक्त २ मार्कांसाठी गेली . 
हे सर्व यासाठी लिहले कारण मी एकदम नॉर्मल family तून आहे. मी खूप संघर्ष केला आहे असे काही नाही पण  मी माझा अभ्यास मात्र खूप प्रामाणिकपणे केला . माझ्यासारखे बरेच असतील तर त्यांना एवढेच सांगेन तुम्ही जे करता ते मनापासून आणि प्रामाणिकपणे करा यश निश्चित मिळेल . 

थोडक्यात MPSC मार्क्स बद्दल 

MPSC मुख्य परीक्षा मार्क्स :
GS १ :४४
GS २: ५५
GS ३: ४६
GS ४:४०
मराठी :७३ 
इंग्लिश : ४५

मुलाखत  :६८

Panel : पटेल सर 
मुलाखत वेळ : १५-१७ मिनिट 
मुलाखत दिनांक :२४ फेब्रुवारी २०१६ 
 निवड : पोलिस उपाधीक्षक 

Saturday 14 May 2016

नमस्कार मित्रांनो ,

मी डॉ. सचिन केरबा पानझाडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी ),परभणी  येथील  रहिवासी  आहे।

माझे   दहावी पर्यंतचे शिक्षण बहिर्जी स्मारक विद्द्यालय वसमत येथे झाले। त्यानंतर  मी  ११  व् १२ वी

ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथून केले। त्यानंतर मी रा.अ.पोदार वैदैकिय महाविद्यालय ,मुंबई  येथून

B A M S  केले।

मी साधारन  २०१२ पासून UPSC /MPSC चा  अभ्यास  सुरु  केला। मला  मिळालेले  यश व अपयश थोडक्यात  असे ,





२०१२  IBPS PO EXAM  CLEARED -NOT GIVEN INTERVIEW (BCOZ  I AM  NOT

                                                                                                 INTERESTED IN BANKING )

२०१३ AND २०१४  CLEARED IB  EXAM BUT UNABLE TO CRACK  INTERVIEW .


२०१३  MPSC राज्यसेवा ( पूर्व ) CLEARED BUT FAILED  IN MAIN
२०१४ MPSC राज्यसेवा पूर्व,  मुख्य परीक्षा  दिला परंतु  मुख्य परीक्षामधे कमी गुण मिळाल्याने POST मिळाली नाही (मुलाखती मधे ५८ /१०० )
2015 MPSC राज्यसेवा पूर्व,  मुख्य परीक्षा मुलाखती मधे( ६१/१०० ) गुण  प्राप्त।


UPSC २०१५ GIVEN MAIN BUT UNABLE TO QUALIFY FOR INTERVIEW.
  

Friday 13 May 2016

माझे MPSC मधील अनुभव

* नाव रावडे स्वप्निल आप्पासाहेब 

* 2. कोणत्या पदी निवड झाली -
तहसिलदार

* 3. मुख्य परिक्षेचा सीट क्रं-
PN005308

* 4.वय-
26

* 5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या ..: 
4 वेळा

* 6.शाळेतील माध्यम-
मराठी 

* 7.महाविदयालयातील माध्यम-
इंग्रजी

* 8.मुख्य गाव , तालुका , जिल्हा-
रुई छत्रपती , तालुका : पारनेर , जिल्हा: अहमदनगर

* 9.अगोदरचा काम करण्याचा अनुभव-
विक्रीकर निरीक्षक नोव्हे. 2013 पासून (2012 ला निवड)

* 10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश
CDS- 3 वेळा मुलाखतीतून बाहेर
SSC 2012 मध्ये tax assistant म्हणून निवड

* 11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?--- 
चाणक्य आणि ज्ञानदीप. 
मॉक मुलाखती दिल्या का ?- 
होय 5 ते 6 ठिकाणी

12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .
-1.excise sp
2. तहसिलदार
3. ARTO
4. DCEO
5. ACST

13.१०वी ला किती टक्के मार्क-81.73%

14. १२ वी ला किती टक्के मार्क-77.83%

15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळाले-BE IT 57%

16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
BE IT from MIT कॉलेज पुणे ,2011

17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे का-नाही

18.छंद अथवा अंवातर कौशल्ये-
carrom खेळणे

19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमी
जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण
ग्रामीण पार्श्वभूमी
-वडील माध्यमिक शिक्षक
आई गृहिणी
भाऊ प्राध्यापक

20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?
-Engg च्या क्षेत्रात मन रमत नव्हते
काहीतरी समाजासाठी करावे अशी इच्छा होती.
आपण खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो हि भावना

21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?
विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?
-नापास झाले कि टेन्शन येते आपोआप जास्त अभ्यास होतो
आणि आपल्या बरोबरची मुले पास झाली कि आपणही करू शकतो असा विश्वास मिळतो.
स्वतःवर नियंत्रण ठेवून आपण करू शकतो हे कायम स्वतःला बजावत राहणे

22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?
-अपयशासाठी कायम एकच गोष्ट कारणीभूत असते अभ्यासामधील कमी .
त्याच बरोबर maturity आणि सातत्य कमी पडले
सातत्य आणि मेहनत या दोन गोष्टीच यश मिळवून देतात
जास्त अभ्यास आणि परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाचे analysis करून यश मिळवता आले.


23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?
-परीक्षेच्या आधी काही दिवस सुट्टी घेऊन इतर वेळी ऑफिस मध्ये वेळ काढत काढत.
शक्यतो पूर्ण वेळ किंवा कमीत कमी 7 तास अभ्यास कसा होईल ते पहावे
-
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रिया
-CSAT ची तयारी नीट केली तर 90 मार्क्स आरामात मिळतात
GS मध्ये बरेचसे प्रश्न बाहेरचे होते पण मेरिट त्याच प्रश्नावर लागेल जे सगळ्यांना येत होते
जे सगळ्यांना येत ते चुकलं तर पास होण्याची शक्यता कमी होते.

25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?
-नाही लावली
-
-26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?
-पेपर 1--60
पेपर २--96

27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?
-मराठी 67
इंग्रजी 67
पेपर 1 53
पेपर 2 55
पेपर 3 64
पेपर 4 52
मुलाखत 67
एकूण 425

28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?
-आधीच्या सगळ्या पेपर्स चे analysis STI PSI आणि सगळ्याच mpsc परीक्षांचे पेपर्स चे पण
त्यानुसार पुस्तके वाचायला सुरवात करणे,.
पेपर 1 मध्ये इतिहास या विषयापेक्षा भूगोल या ऊशयावर भर द्यावा
पेपर 2 मध्ये कायद्यांच्या separately नोट्स काढून ठेवाव्यात वेळ मिळेल तेवा सातत्याने revision करावी
पेपर 3 मध्ये तयारी करताना रोज एकाच संस्थेचं पूर्ण अभ्यास करावा
एकापेक्षा जास्त संस्था किंवा कायदे एकाच दिवशी घेऊ नयेत

29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?
-ज्या प्रश्नामध्ये 2 पर्यायात confusion आहे तो सोडवायचाच.
3 पर्यायात confusion असणारे सर्व प्रश्न सोडून द्यायचे.
Calculated रिस्क घेऊन प्रश्न सोडवा

30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?
-Movies पाहणे आणि ज्या गोष्टींनी रिलॅक्स वाटते अशा गोष्टी मधून मधून करत राहणे.
-
-31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?
--जास्तीत जास्त प्रश्न सोडवा
पुस्तके कमी आणि नीट वाचा.
रोजच रोज अभ्यासच analysis लिहून ठेवा
रोज रात्री दिवसभरात आपण काय शिकलो एवढाच 10 मिनिटात आठवावे
Knowledge मध्ये value addition झाली असेल तर आपण योग्य मार्गाने चाललोय अस समजून घ्या

32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?
-खूप जास्त 
Geo आणि इकॉनॉमी साठी तर खूपच
Mrunal आणि gktoday ची website
प्रधानमंत्री आणि संविधान या ABP माझा च्या series नक्की बघा

33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?
-1 महिना
-
-34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?
--काही विषय जे अवघड जात होते त्यांच्या नोट्स काढल्या होत्या पण बऱ्याचशा पुस्तकांवरच काढल्या होत्या वेगळ्या नाही.
वेगवेगळ्या पुस्तकातला डेटा एकाच पुस्तकात घ्यायचा प्रयत्न करा
त्यासाठी पुस्तकातील मोकळ्या जागेचा वापर करा

35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?
-Separate नोट्स काढून
उदा.
कायदे
रिमोट सेन्सिंग
इतिहासातील कायदे
नवीन योजना
पेपर 3 मधील संस्था
पेपर 4 मधील economic theories
-
-36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?-
-Gktoday आणि ज्ञानदीप magazines
-
-37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?
--5 ते 6 मॉक दिले 
-दोन्ही मध्ये जास्त सारखेपणा नसतो पण confidence build व्हायला मदत होते
-जेवढे शक्य असेल तेवढे मॉक द्यावेत त्याचा नक्कीच फायदा होतो शक्यतो आपला कॉन्फिडन्स वाढेल अशाच ठिकाणी द्यावा
-
-38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?
-श्री. पटेल सर
-
-39.मुलाखत किती वेळ चालली ?
-15 मिनिट
-
-40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?
-Current आणि sales tax च्या संबंधित सगळे प्रश्न होते
सगळे opinion based होते
स्वप्निल रावडे
विक्रीकर निरीक्षक
BE IT
अध्यक्ष - पटेल सर

कोठून आलात?
ग्रामीण भागातील आहात काय?
सध्या काय करता?
NGT चा काय issue आहे??
रविशंकर यांनी यमुनेच्या काठवरचीच जागा का निवडली?
आर्मी ला ब्रिज बांधायला लावणे चुकीचे नाही काय??
का चुकीचे आहे?
JNU प्रकरण काय आहे?
JNU प्रकरणात दिल्ली पोलीस आयुक्तांनी बोलायला पाहिजे होते काय??
ते चुकीचे नाही का??
कोणत्या राज्याने निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणाची अट असण्याचा कायदा केला आहे?
तुम्हाला काय वाटत अशी अट असावी का?
का नसावी?
एखादा मध्यम मार्ग नाही का?
काही वर्षानंतर अशी अट ठेवता येईल का?
IT कायदा कधीच आहे?
त्याचा उद्देश काय आहे?
त्यात नुकसान भरपाई साठी काही तरतूद आहे काय?
IT चा प्रशासनात काय फायदा होईल??
राष्ट्रीय फुल?
राज्य फुल?
Sales tax च किती टार्गेट पूर्ण झालाय?
TDS काय आहे?
एखादया गोष्टीवर विक्रीकर लावायचा कि सेवा कर कसा ठरवणार?
SIM कार्ड घेतल्यावर कोणता टॅक्स लावणार?
प्रशासकीय अधिकारी म्हणून निर्णय घेताना कायदा सोडून इतर कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे??
GST काय आहे?
महाराष्ट्राला फायदा होईल कि तोटा?
Manufacturing state असल्याने महाराष्ट्रात उद्योगांचा असलेला कर बुडणार नाही का?
मग महाराष्ट्र सरकार उद्योगांना कशाला प्रोत्साहन देईल?
Dysp पसंतिक्रम का टाकला नाही??

41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?
-थोडेफार प्रश्न expect केल्यासारखे होते
बरेचसे unexpected प्रश्न होते.

42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?-STI ची नोकरी

43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?
-त्या प्रश्नावर मेरिट लागत नाही
सगळ्यांना जे येतात त्याच प्रश्नावर मेरिट लागते
ज्याच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही ते ignore करून जे करू शकतो तेच अधिक चांगले करणे गरजेचे.

44.आपल्या यशातील भागीदार कुटुंब/शिक्षक/मित्र?
-आई,बाबा,भाऊ , मामा, मामी, आजी आणि माझे मित्र ज्यानि वेळोवेळी प्रोत्साहन दिले असे माझे मित्र
याबाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो
या लोकांशिवाय मी पास होणे शक्यच नव्हते.

Thursday 12 May 2016

सुरुवात करताना…

सुशिल संसारे. 


                                विध्यार्थी मित्रांनो / मैत्रिणींनो, पूर्व परीक्षेची answer key सर्व जणांनी check केलीच असेल. एकंदर scores वरून असे लक्षात येते की, Cut - off  हा खुल्या वर्गासाठी १४०-१५० असू शकेल. अजून final key यायची आहे. त्यामुळे ज्यांचा score १५० च्या वर असेल त्यांनी अभ्यासाला नक्कीच सुरुवात केली असेल. पण मी १३०-१४० score असणार्यांना सुद्धा मुख्य परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला देईन. या बाबतीत माझा स्वतः चा अनुभव फार विस्मयकारक होता. तो मी येथे नमूद करत आहे …. 

                                २०१४च्या पूर्व परीक्षेच्या वेळी माझी अशीच अवस्था होती. मी त्या वेळी SIAC मुंबईला होतो आणि ती माझी दुसरी पूर्व परीक्षा होती. माझा score कमी होता म्हणून मी MPSC कडे लक्ष न देता UPSC ची तयारी करत होतो. सोबतचे इतर मित्र मुख्य परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त होते व मी इतर वाचनात लागलो. खर सांगतो मित्रांनो या पूर्वी मी मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम कधीच पूर्ण केला नव्हता. कारण मी नेहमी हाच विचार करायचो कि जेव्हा मी मुख्य परीक्षा देईन तेव्हा आपोआपच तो होऊन जाईल.… कदाचित आपल्यापैकी काही जण असाच विचार करत असतील. पण याचा मला तोटाच झाला. जेव्हा पूर्व परीक्षेचा result लागला तेव्हा त्यात माझा number नव्हता…. मला त्याचे वाईटही वाटले नाही,कारण मी असा विचार आधीच करून ठेवला होता. त्या दिवशी माझ्या सोबतचे SIAC मधील सर्व मित्र पास झालेले होते. तेव्हा मला जाणीव झाली की सर्व पांढऱ्या बदाकांमध्ये एक काळा बदक कसा उठून दिसतो ते. 

                                 त्यातल्याच एका मित्राने अनवधानाने एक धारदार विधान केले ,'' महाराष्ट्रातील SIAC साठी select होणाऱ्या पहिल्या १०० मुलांमधून पूर्व परीक्षा fail होणाऱ्याची इथे select होण्याची लायकीच नाही.'' खूप खोलवर जखम झाली होती… पण तरीही चेहऱ्यावर हास्य होते. दुसऱ्याच दिवशी एक प्रश्न रद्द झाल्याने cut-off दोन मार्कांनी खाली आला… जणूकाही चमत्कारच झाल्याचा भास मला झाला… तेव्हा कळले कि MPSC त काहीही होऊ शकते. त्यामुळेच सांगतो मित्रांनो अभ्यास सुरूच ठेवा. कारण आत्ता केलेला अभ्यास कधीच वाया जाणार नाही… त्या नंतर माझ्याकडे फक्त दीड महिना होता. त्यात मुख्य परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम पूर्ण करणे जवळ जवळ अशक्यच होते…. अतिशयोक्ती नाही सांगत मित्रांनो,पण त्या दीड महिन्यात मी खरोखर १२-१३ तास effective study केला. यात माझ्या SIAC मधील मित्रांचा मला खूप फायदा झाला. ते मला रोज काहीतरी target द्यायचे व मी ते दिवस अखेर पूर्ण करायचो. कदाचित त्यामुळेच मी पहिल्यांदाच मुख्य परीक्षा पास करून मुलाखतीला पात्र झालो. 

                                    सांगण्याचे तात्पर्य हेच कि तुम्ही थांबू नका. अभ्यास सुरूच ठेवा. भलेही त्याचा फायदा तुम्हाला आत्ता होणार नाही,पण भविष्यात माझ्या सारखी वेळ तुमच्या वर येणार नाही.…

धन्यवाद. 

Wednesday 11 May 2016

About Me....Sushil Sansare(Dy CEO).

Hi all,


नाव :- सुशिल संसारे . 

शिक्षण :- 1) BSc (physics) 2008.
            2) MSc (physics) 2011.

MPSC गुण :-
            १) मराठी - ५१
            २) इंग्रजी - ७१
            ३) GS I - ४७
            ४) GS II- ४३
            ५) GS III-३८
            ६) GS IV-५४

             मुलाखत  - ६८

MPSC तयारी :- २०१२ पासून 

दिलेल्या परीक्षा :-
             १) PSI (२०१३) मुलाखत , निवड नाही 
             २) राज्यसेवा (२०१४) मुलाखत , निवड नाही 
             ३) राज्यसेवा (२०१५) मुलाखत व निवड. 

इतर परीक्षा :-
             १) NDA 
             २) CDS 
             ३) NCC special entry scheme.
             ४) SSC CGL  मुख्य परीक्षा. 
     
                     Army Officer साठीचे  SSB interviews:- ११ वेळा 

सध्याच्या निवडी बद्दल :- 

                   ''कुठलीही गोष्ट  सहजा सहजी  मिळत नसते  त्यासाठी  अथक  परिश्रम आणि सातत्य खूप गरजेचे असते ''. मित्रांनो मला या वाक्याचा प्रत्यय क्षणोक्षणी आला . मागील वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेत फक्त ५ मार्कांनी post हुकली … त्या गोष्टीचा पशात्ताप करत न बसता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो . स्पर्धेची जाणीव मला Defence साठीच्या SSB मुलाखत देतानाच झाली होती . त्यात ११ वेळा शेवटच्या टप्प्यातून माघारी आल्यामुळे माझा  'इगो ' कधीच  धुळीत मिळाला होता. त्याचा फायदा मला MPSC  च्या परीक्षा देतानाही जेव्हा result negative यायचा तेव्हा झाला . कदाचित त्या मुळेच मी स्थिर राहू शकलो . 

                       कुठल्या गोष्टीचा फायदा भविष्यात कुठे आणि कसा होईल ते सांगता येत नाही … म्हणून परीक्षा देत राहाव्यात . 

                       मी माझा स्पर्धा परीक्षातील  जीवन पाट सखोल लिहित आहे … तो पूर्ण होताच मी blog  वर post  करेन . 

यशात मोलाचा वाटा :- 
              
                      सर्व प्रथम आईवडिल आणि बहिणीचा खूप महत्वाचा वाट या माझ्या यशात आहे . मी इतर माझ्या सहकारी मित्रांपेक्षा थोडा नशीबवान होतो कि माझ्या आईवडिलांना या परीक्षांबद्दल पुरेशी माहिती होती . माझे वडील स्वतः माहिती मिळवत व ती आईलाही समजून सांगत . त्यामुळे मला घरी जास्त गोष्टी explain  कराव्या लागल्या नाही . मला वाटते कि इतरही पालकांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा … आपल्याला अनोळखी विषयाबद्दल जाणून घेण्याची वृत्ती नेहमीच जागृत ठेवायला हवी. 

                       त्या नंतर माझे गुरुजन वर्ग ,ज्यांनी मला योग्य वेळी मार्गदर्शन केले आणि कदाचित ते नसते तर मला हे शिखर गाठायला थोडा आणखी वेळा लागला असता असे श्री .रंजन कोळंबे सर . या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला अनेक गुरुजनांचे मार्गदर्शन लाभले . मी ठरवलेच होते की आपल्याला प्लेटो होऊन प्रत्तेक सोक्रेटीस कडून ज्ञान मिळवायचे आहे . So you should be a Good Listener first . 

                        आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे ते सर्व मित्र ज्यांनी कायम मला push करण्याचे काम केले. स्पर्धा परीक्षेच्या या विश्वात मी ठरूनच खूप कमी मित्र बनवण्याचा प्रयत्न केला होता … कारण मला नाही म्हणणे जमत नसे . माझ्या प्रत्तेक मित्राचा मी माझ्या पद्धतीने अभ्यासाला अनुरूप उपयोग केला . त्यामुळे गरजे पुरतेच संभाषण आणि group discussions चा फायदा मला खूप जास्त झाला . 

संघर्ष करणार्यांना संदेश :- 

                          मित्रांनो या विश्वात एक गोष्ट पक्की खुणगाठ बांधून घ्या … इथे चुकीला माफी नाही , तुम्हाला support करणारी जनता कमी असून तुम्हाला खालीच खेचायला लोक अधिक उत्सुक आहेत , इथे वेळेला अनन्य साधारण महत्व आहे , गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि आपल्याकडे पशात्ताप करण्या इतकाही वेळ नसतो . त्यामुळे  जेवढा वेळ मिळतोय तेवढा सगळाच्या सगळा सत्कारणी लावा . एकदाका तुम्हाला post मिळाली की सर्व गोष्टी सुरळीत होतात . त्यामुळे Don't worry… Keep Struggling Keep Winning!!!

धन्यवाद . 

सुशिल संसारे . 

Tuesday 10 May 2016

तुमच्या सोबत अनुभव share करणारे अधिकारी मित्र....

नमस्कार,


मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या सहकारी अधिकाऱ्यांची यादी येथे  देत आहे. यातील प्रत्तेक अधिकारी तुमच्या साठी आपला अमुल्य वेळ काढून लिखाण करणार आहे. हे सर्व अधिकारी सध्या यशदा व वनामती मध्ये प्रशिक्षण घेत असून त्यांनी स्वतः कष्ट करून जे यश संपादित केले आहे त्या बद्दल ते तुमच्याशी काही अनुभव share करतील.

१) मुकुल कुलकर्णी (Dy Collector)

२) विशाल ढुमे (Dy SP)

३) अनुराधा गुरव (Dy SP)

४) प्रशांत ढोले (Dy SP)

५) सुशिल संसारे (Dy CEO)

६) सचिन पानझडे. (Dy CEO)

७) प्रशांत काळे. (Dy CEO)

८)  प्रवीण सिनारे (Dy CEO)

९)  विवेक जमदाडे (Dy CEO)

१०) विशाल नाईकवडे (Tahasildar)

११)  स्वप्नील रावडे (Tahasildar)

१२) शेखर देशमुख (A BDO)



धन्यवाद . 

Saturday 7 May 2016

Warm Welcome to all MPSC aspirants....

नमस्कार मित्रांनो,

मी सुशिल संसारे ( राज्यसेवा २०१५ ,उप मुख्या कार्यकारी अधिकारी Dy CEO) यशदा मधील प्रशिक्षणर्थी अधिकारी आहे. खुप दिवसांपासून एक सुप्त इच्छा होती की ज्या प्रमाणे UPSC चे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना blog द्वारे मार्गदर्शन करतात त्या प्रमाणेच MPSC साठी आपणही मार्गदर्शन करावे. पण फक्त माझ्या एकट्याचेच विचार न देता माझ्या सोबतच्या यशदा आणि वनामती तील सहकारी मित्रांचेही विचार तुमच्या पर्यंत पोहोचावेत.


हाच उद्देश ठेऊन मी हा blog काढत आहे. यात मी व माझे सहकारी मित्र पुढील गोष्टींचा आशय मांडतील.

१) परीक्षा वेळापत्रकानुसार व आभ्यास्क्रमानुसार नियोजन. हे नियोजन आम्ही कसे केले व काय अडचणी येतत.

२) विशिष्ठ विषयाचा, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला व त्यांना कोणत्या अडचणी आल्या.

३) सामान्य अध्ययन व CSAT ची तयरी.

४) मुलाखतीतचे मर्गदर्शन. (मुलाखतीत जास्त score आलेल्या विद्यार्थ्यांकडून ).

५) परीक्षेच्या कालावधीत होणाऱ्या साधारण चुका आणि जास्त लक्ष देण्या सारख्या बाबी.

६) इतर महत्वाच्या पण दुर्लक्षीत गोष्टी.


हि या blog ची साधारण रूपरेषा असेल. आमचा हेतू तुम्हाला support करणे आहे. अभ्यास करणे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.


शुभेछा.


सुशिल संसारे
( Dy CEO)