Sunday 22 May 2016

निबंधाचे काही साधारण विषय.

सुशिल संसारे. 


मराठी व इंग्रजीसाठी मी माझे मित्र श्री. मंगेश शिंदे(मुख्य अधिकारी, नगरपालिका ) यांनी मला दिलेले काही विषय येथे नमूद करत आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत निबंध लिहून practice करावी…. 

१) राजकारण :- 
         - बदलते राजकारण बदलता समाज. 
         - आधी काय राजकारण की समाजकारण.  
         - मतदार राजा जागा झालाय!!!

२) प्रशासन:- 
        - Good Governance/ सुशासन काळाची गरज. 
        - e-governance फायदे आणि तोटे. 

३) पर्यावरण:- 
        - आदिवासी आणि जमीन अधिग्रहण…समस्या आणि उपाय. 
        - दुष्काळ किती नैसर्गिक किती मानवनिर्मित. 
        - लातूरच्या भयंकर दुष्काळात सापडलेल्या एका शेतकऱ्याचे मनोगत. 

४) भारत:- 
        - असा आहे माझ्या स्वप्नातला भारत. 
        - खरच आपण सहिष्णू आहोत का ? 

५) महाराष्ट्र:- 
        - आज महाराष्ट्र मागे पडतोय का ?
        - महारष्ट्रातील तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्या.

६) महिला:-
        - महिला या विषयावर नेहमी राजकारणच होते समाजकारण नाही. 
        - महिलांना सर्व क्षेत्रात ५०% आरक्षण दिले तर…  
        

७) इतर:-
        - महाराष्ट्राने भारताला सहकार दिला पण तो महाराष्ट्रात रुजला का ? 
        - भारतीय शिक्षण पद्धत… आढावा. 
        - नक्षलवादाचे बदलते स्वरूप … 
        - जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले…। 

             
                            मित्रांनो हे topics फक्त practice साठी आहेत. असेच विषय परीक्षेत येतीलच याची खात्री नाही. त्यामुळे आणखी वेगवेगळ्या विषयांचा सराव करत राहावा. लोकसत्ता पेपर मध्ये श्री. देशमुख सर "करियर" पुरवणीत निबंध लेखनावर लेख लिहित असतात. कृपया ते पाहावे. त्यात काहीवेळा सरांनी काही current topics सुद्धा दिले होते. UPSC पेपर मधील विषय ही पाहावे. 

                           निबंध हा विषय MPSC ने सामान्य विषायांपुरता मर्यादीत न ठेवता मागील वर्षी मराठीत "भाषेचे व्याकरण भाषेचे चरित्र" असे विशेष भाषेशी निगडीत विषय निवडले आहेत. त्यामुळे असे विषयही तुमच्या लिखाणात यायला हवे. 


धन्यवाद . 

2 comments:

  1. Reading novals,autobiography,biography,stories etc can helpful to make writing skills ,personality development.

    ReplyDelete