Tuesday 17 May 2016

"माझी अभ्यासाची पद्धत."

सुशिल संसारे.


                             माझ्या संघर्ष करणाऱ्या मित्रांनो, या वर्षीचा MPSC चा attempt मी दिला नाही. पण जर मी तो दिला असता तर मी पुढील प्रमाणे माझा अभ्यास केला असता…. 

                 
                            अभ्यास करण्याच्या माझ्या पद्धतीत फार काही वेगळे पण नाही. B.A., B.Com., B.E. किंवा B.Sc. करणरे विध्यार्थी ज्या प्रमाणे परीक्षेच्या एक आठवडा आधी अभ्यासाला सुरुवात करतात त्याच पद्धतीचा वापर मी केला. फक्त फरक एवढाच कि मी हि पद्धत थोडी extend केली.


मुख्य परीक्षा :- २३ सप्टेम्बर २०१६…
कालावधी:-    ४ महिने…. पण मी स्वतः ३ महिनेच धरेन.

१) पहिल्यांदा मुख्य परीक्षा देणारे आणि अजून पूर्ण अभ्यासक्रम न झालेले…. यांच्यासाठी.

                            या ३ महिन्यांचे दोन भाग करू…

            अ) पहिल्या दीड महिन्यात तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम संपवणे हा target असेल.
                      - यात सर्वात अवघड विषय आधी  घेणे .
                      - विषयांचे groups केले तर अभ्यास अधिक सोपा होईल .
                         Eg. भूगोल + विज्ञान + पर्यावरण , भूगोल + कृषी , राज्यशास्त्र + govt. schemes, etc.
                      - ठरवलेल्या दिवसांपेक्षा एक दिवसही extra देऊ नये…
                      - सोप्या व लवकर संपणाऱ्या विषयांचे दिवस दुसऱ्या अवघड विषयांसाठी ठेवावे .
                      - रविवारी फक्त मराठी व इंग्रजी चा अभ्यास करावा.
                      - रोज कमीत कमी १० तास अभ्यासाचे टार्गेट असावे.
                      - या दीड महिन्यात तुमच्या आधी जर notes  नसतील तयार तर त्या तयार कराव्या.( Very IMP )
                      - दीड महिन्याच्या शेवटी तुमच्या कडे सर्व विषयांचे पूर्ण ज्ञान  व solid notes तयार पाहिजेत.

 I know its tough but not impossible....if you want to achieve something great then your efforts must be that great. अभ्यासात सातत्याने हे शक्य आहे . I guarantee you... if I can do it then why not you!!!

              ब) Second half शेवटचा दीड महिना … 
                       - यात पहिल्या १५ ते २० दिवसात तुम्हाला मिळतील तेवढे वेगवेगळ्या क्लासेस चे papers सोडवणे.
                       - papers वेळेत सोडवणे खूप महत्वाचे आहे. याच्याने तुमचा confidence वाढतो आणि वेगवेगळे प्रश्न कसे handle  करायचे ते समजेल.
                       - papers सोडवतांना तुम्हाला काही experiments करायचे असतील तर याच stage ला करावे Eg. एखादा topic कच्चा असेल तर त्याला कोणत्या वेळी सोडवायला घ्यावा हे ठरवणे.
                       - papers सोडावून झाल्यावर तुम्हाला कळेल की तुमचा कोणता विषय किंवा कोणता topic कच्चा आहे. त्यावरच focus करणे.
                       - papers  मधून मिळालेली extra  माहिती तुमच्या notes मध्ये टाकून update करणे.
                       - नंतरच्या २० दिवसात एक revision व्हायलाच हवी .
                       - revision करतांना मुख्यतः आकडेवारी चा संबंध जेथे येतो त्या ठिकाणी A4 paper चा half paper करून त्यावर फक्त संबंधित विषयाची आकडेवारी लिहिणे. या आकडेवारीचा उपयोग exam च्या शेवटच्या दिवशी फक्त एक नजर टाकण्यासाठी करावा. आकडे काही काळासाठीच लक्षात राहतात.
                        -अर्थ संकल्प आणि लोकसंख्या माहिती हे त्या त्या paper च्या आदल्या दिवशी वचने.


   २) आधी मुख्य परीक्षा दिलेल्यांसाठी …… 


                                      वरील पद्धतीत फक्त पहिल्या १५-२० दिवसात तुम्ही मागील notes मध्ये जास्तीत जास्त addition करायची आहे. प्रत्तेक विषयाचे या आधी न वाचलेले पुस्तक वाचावे.(कोणती पुस्तके वाचावी यावर मी स्वतंत्र post टाकणार आहे. इतर blogs वर पुस्तकांची यादी दिलेलीच असते. तुम्ही ती refer करू शकता. मी फक्त मी वाचलेली पुस्तकेच post करेन.  )…… आणि second half तुमच्यासाठी सारखाच राहील.



महत्वाचे :- 

                              MPSC सारख्या परीक्षेत माझ्या मते स्वतः च्या NOTES काढणे खूपच जास्त महत्वाचे आहे. मी हे स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे. NOTES काढल्यामुळे परीक्षेच्या शेवटच्या वेळी revision करतांना मानसिक समाधान असते की माझ्याकडे एवढ्या NOTES आहेत आणि त्यात मी सगळा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षेच्या आदल्या रात्री पुस्तकांचा ढीग घेऊन बसण्यापेक्षा एकच NOTES घेऊन वाचने कधीही चांगले आणि सोपे.

                               तुमच्या NOTES काढून झाल्यावर त्याचायचं micro notes काढाव्यात.(NOTES कशा  काढाव्या या साठी स्वतंत्र post टाकण्यात येईल.) मी यावरच जास्त भर दिला आहे.


                               तुमचं काहीही शंका असतील तर please comment मध्ये post कराव्यात. माझ्यापरीने निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन.



धन्यवाद.




1 comment: