नमस्कार मित्रांनो,
राज्यसेवा मुख्य परीक्षा तुम्हाला चांगली गेली असेल अशी अशा करतो. तुम्हाला कदाचित कळले असेल की योग्य वेळी revision करणे किती महत्वाचे असते. त्याच बरोबर जर तुम्ही question papers solve केले असतील तर प्रश्नांचा नेमका अर्थ आणि त्याचे नेमके उत्तर शोधण्यात तुम्हाला जास्त अवघड गेले नसेल. ज्यांना परीक्षा अवघड गेली त्यांनी स्वतःच्या strategy चे analysis करावे. नेमका आपला अभ्यास कमी होता की आपली प्रश्न सोडवण्याची पद्धत चुकली हे जाणून घ्यावे आणि पुढच्या वेळी त्या चुका होऊ नयेत याची काळजी घ्यावी.
या नंतर च्या महत्वाचा टप्पा म्हणजे "मुलाखत". तसे पाहिले तर मुलाखत काही फारशी अवघड नसते. कारण त्यात ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे असेच प्रश्न विचारले जातात.... कदाचित माझ्या या वाक्याशी बहुतेक जण सहमत नसतील पण ते सत्य आहे. कित्तेक वेळा आपण ऐकले असेल कि आपला interview आपण स्वतःच drive करत असतो. तुम्ही सुरुवातीला जे उत्तर देता त्यावरच पुढचा प्रश्न अवलंबून असतो. उदा. तुम्हाला विचारले कि तुमचे नाव न सांगता परिचय द्या... तर सर्वात आधी आपण असे ऐकलेले असते कि नाव व गाव सांगायचे नाही. मग सरांनी तर फक्त नावच सांगू नका असे म्हटले आहे? मग काही जण interviewer ला असेही विचारतात कि सर गावाचे नाव सांगू का? या ठिकाणी आपण चुकतो...तुम्ही प्रश्न नीट ऐकायला शिकले पाहिजे. नाव न सांगता म्हणजे गाव सांगितले तर चालेल असेच असते.
१) मी अबक, तालुका अबक, जिल्हा अबक येथून आलो आहे.
२) मी अबक नदीच्या काठी वसलेल्या अबक गाव तालुका अबक व जिल्हा अबक येथून आलो आहे.
वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत पण दुसऱ्यात मला माझ्या गावाशेजारील नदीचे महत्व माहित आहे व मला त्यावर जास्त प्रश्न विचारले जावेत अशी माझी अपेक्षा आहे हे दिसून येते. याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतांना तुम्हाला कोणत्या बाबींवर विचारले जाण्याची अपेक्षा आहे त्या बाबींचा उल्लेख करावा. पण प्रत्येक वेळेस असा उल्लेख टाळावा.
मागील दोन वर्ष्यांचे माझे interview मी डिटेल लिहून post कारेन. मी असे मुळीच म्हणणार नाही की तेच तुम्ही follow करा. कदाचित माझ्यापेक्षा त्यावेळी इतरांनी अधिक चांगली उत्तरे दिली असती. माझे interview फक्त नमुन्य खातर पाहावे.... कृपया copy करण्याचा प्रयत्न करू नये. मुलाखतीत तुमचा natural स्वभावच महत्वाचा असतो.
धन्यवाद.
सुशिल संसारे.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteNice...n thanku for guide
ReplyDelete